आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:शरद पवारांनी आज बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक, राज्यातील सद्य:स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे. मलबार हिल येथील सह्यादी शासकीय अतिथिगृहात सायंकाळी सहा वाजता बैठक होईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या “ईडी’च्या नोटिसा, भाजपची नुकतीच झालेली जनआशीर्वाद यात्रा या पार्श्वभूमीवर पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे. बैठकीत राज्यातील सद्य:स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीची माहिती दिली. बैठकीत पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्या कामाची तसेच जिल्ह्याजिल्ह्यातील कामांसंदर्भात आढावा घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ढवळून निघालेली परिस्थिती यावर चर्चा होणार असून महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांना पवार जोमाने कामाला लावण्याची शक्यता आहे. पवार लवकरच राज्याचा दौराही करणार असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...