आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sharad Pawar Discharge Today: Doctor's Advice To Rest At Home For A Week; The Surgery Will Be Repeated In Fifteen Days ; News And Updates

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज​​​​​​​:आठवडाभर घरीच विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला; पंधरा दिवसांनी पुन्हा होणार शस्त्रक्रिया

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा तथा खासदार शरद पवारांना मुंबई येथील ब्रीच कँड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान त्यांना आपल्या 'सिल्व्हर ओक' या घरी नेण्यात आले असून पुढील सात दिवस विश्रांती करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. गेल्या मंगळवारी शरद पवारांना पोटदुखीचा त्रास उदभवल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर पित्तनलिकेत खडे असल्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे समोर आले होते. दरम्यान त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील आठवडाभरांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

पंधरा दिवसांनी पुन्हा होणार शस्त्रक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोशल यांनी सांगितले की, खासदार शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना पुढील सात दिवस विश्रांतीची गरज आहे. पण, पुन्हा पंधरा दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यकर्त्यांना संदेश देतांना सांगितले की, "पवार साहेबांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्यानं त्यांच्या भेटीस जाण्याचं टाळाण्याचे आवाहन केले."

जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर ट्वीट करत माहिती दिली
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत आपल्या सोशल मीडिया ट्विटर हँडलवरुन ट्वीट करुन सांगितले की, ही 'महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी असून पवार साहेब फिट अँड फाईन आहेत.'

बातम्या आणखी आहेत...