आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची तब्येत ठणठणीत:मुंबईतल्या ब्रीच कँडीमधून मिळाला डिस्चार्ज; सुप्रिया सुळे यांनी मानले डॉक्टर अन् टीमचे आभार

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेत.

पवारांवर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. याच काळात त्यांनी शिर्डीतल्या अधिवेशनालाही हजेरी लावली. मात्र, त्यांचे भाषण दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले.

काय झाले उपचार?

पवार यांच्यावर गेल्यावर्षी मार्चमध्ये ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, पोटदुखीमुळे त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पित्ताशयात खडे झाल्याचे समोर आले. एन्डोस्कोपीद्वारे पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. मात्र, अजून त्यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झाली नव्हती. याच काळात त्यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरालाही हजेरी लावली. मात्र, तिथेही त्यांनी अवघ्या चार-पाच मिनिटांत भाषण संपवले. पुन्हा त्यांचे भाषण दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले. या शिबिरातून ते पुन्हा ब्रीड कँडीमध्ये दाखल झाले. आत आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सुप्रियाताई म्हणतात की...

सुप्रिया सुळे यांनी पवारांवर चांगले उपचार केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात, कृतज्ञता. ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि संपूर्ण टीमचे आभार. नेहमीप्रमाणे त्यांनी चांगले काम केले. पवार साहेब आता घरी आहेत.

'त्या' भेटीची चर्चा

पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. या भेटीनंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य करून राळ उडवून दिली होती. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. शिंदे आणि पवार साहेबांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे. ही भेट भविष्यात काहीतरी वेगळं देऊन जाईल. मात्र, या चर्चेला अर्थ नाही. शिंदे यांनी केवळ पवारांच्या प्रकृतीची भेट घेतली. यातून काही वेगळे घडणार नाही, अशी सावरासावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...