आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांची हेल्थ अपडेट:शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया, नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तोंडातील अल्सरसंदर्भात शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तब्येतीविषयी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.

तोंडातील अल्सरसंदर्भात शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला. आता त्यांची तब्येत एकदम ठणठणीत असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली. नुकतीच त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असताना त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला. यानंतर ही शस्त्रक्रिया केली.

यावेळी नवाब मलिक म्हणाले की, शरद पवार यांची तब्येत चांगली आहे. ते रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. यासोबतच देशातील कोरोनाच्या परिस्थितीचाही ते आढावा घेत असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले आहे. तसंच, ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील असा विश्वसाही मलिकांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...