आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाच्या हितासाठी:दुग्धजन्य पदार्थांची आयात थांबवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची केंद्रीय दुग्ध मंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसेल, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना याबाबत पत्र पाठवून हा निर्णय रद्द करण्याबाबत विचार करण्याची मागणी केली आहे.

दूध पदार्थ आयात करण्याचा निर्णय बाबत विचार करावा, असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीच्या आधारे शरद पवार यांनी दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्र पाठवले आहे. यात सरकारने दुग्धजन्य पदार्थांच्या घेतलेल्या आयातीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

उत्पन्नावर परिणाम

शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, एका वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली. केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा लोणी आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय असल्याचे दिसून आले. या संदर्भात केंद्र सरकारचा कोणताही निर्णय पूर्णपणे स्वीकारता येणार नाही. कारण या उत्पादनांच्या आयातीचा थेट देशांतर्गत दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल.

पुनरुज्जीवन प्रक्रियेत अडथळा

शरद पवार यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, दुग्ध उत्पादक शेतकरी आत्ताच कोरोनाच्या संकटातून बाहेर आले आहेत. आणि केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल. कृपया माझ्या या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्यास आणि मंत्रालयाने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतल्यास मला आनंद होईल, असे पवार यांनी म्हटले आहे.

लम्पी रोगाने धोका

भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. सुमारे 22 कोटी टन दूधाचे उत्पादन देशात होते. जगाच्या तुलनेत 24 टक्के दूध उत्पादन भारतात होते. परंतु गेल्यावर्षी आलेल्या लम्पी रोगाने देशात गायी-म्हशींचा मृत्यू होत आहे. यंदा सरकारला अंदाजापेक्षा कमी दूधाचे उत्पादन होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यंदा देशाला गरज पडल्यास दूग्धजन्य पदार्थांची आयात करावी लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे.