आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sharad Pawar Live| Pawar On Maharashtra Flood Relief| NCP Chief Suggest Leaders To Avoid Flood Affected Area Visits, Announces Relief Kits For 16000 Families News And Updates

अनुभवातून सांगतोय दौरे टाळा:पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचे वाटप दोन दिवसांत! 250 डॉक्टरांचे पथकही पाठवणार, नेत्यांनी दौरे टाळावेत; शरद पवारांचे आवाहन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार 25 जुलै रोजी एका कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले त्यावेळी टिपलेला फोटो. (ट्विटर) - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार 25 जुलै रोजी एका कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले त्यावेळी टिपलेला फोटो. (ट्विटर)

राज्यातील पाऊस आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. येत्या दोन दिवसांत अडीच कोटी रुपयांची मदत गरजवंतांना पोहोचवणार असल्याचे पवार म्हणाले आहेत. यामध्ये 250 डॉक्टरांच्या टीमचा देखील समावेश राहील. ज्या-ज्या ठिकाणी नुकसान झाले, त्या लोकांना तातडीने कीट वाटप केले जाणार आहेत. सोबतच, आता पूर आणि संकट परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांनी दौरे टाळावेत असे आवाहन सुद्धा शरद पवारांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, महाराष्ट्राला पूराचा मोठा फटका बसला. पुरामुळे घरांसह शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सात ते आठ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. इतर ठिकाणी शेतीला फटका बसला आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या कार्यक्रमानुसार मदक केली जाणार आहे. काही तातडीची मदत सुद्धा राज्य शासनाकडून केली जात असून आढाव्यानंतर आणखी मदत केली जाईल.

राष्ट्रवादीकडून 16 हजार कीट दिल्या जाणार
याच पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून 16 हजार कीट वाटप केल्या जाणार आहेत. या कीटमध्ये दोन प्लेट, दोन ग्लास, दोन वाट्या, दोन शिजवण्याच्या भांडी, एक तवा, एक चमचा, पोळपाट लाटणे यांचा समावेश आहे. राज्यात कोरोना अजुनही संपलेला नाही. अशात संकटग्रस्तांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपाययोजना करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वैद्यकीय विभागाच्या वतीने 250 डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली. हे विविध संकटग्रस्त भागांमध्ये जाऊन सेवा देतील. सोबतच, मास्कही वाटप केले जाणार आहेत.

अनुभवातून सांगतोय, राजकीय दौरे टाळा
संकटग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे कामात अडथळे येतात असे पवारांनी आपल्या अनुभवातून सांगितले. पवार म्हणाले, माझा पूर्वीचा अनुभव आहे. प्रामुख्याने लातूरच्या वेळी... अशा घटना घडल्यानंतर लोक गाड्या घेऊन संकटग्रस्तांच्या भेटी घेण्यासाठी जातात. अशाने आधीच व्यस्त असलेल्या शासकीय यंत्रणांना अडथळे निर्माण होतात. त्यांचे लक्ष विचलित होते. माझे आवाहन आहे, की असे दौरे टाळा. मी लातूरला असताना आम्ही सगळे कामात होतो. तेवढ्यात पंतप्रधान येत होते. तेव्हा मी पंतप्रधानांना सांगितले होते, की 10 दिवस तुम्ही येऊ नका. तुम्ही आलात तर शासकीय यंत्रणांना तिथे लक्ष घालावे लागेल. त्यामुळे त्यांना 10 दिवसांनंतर येण्याची विनंती केली होती.

राज्यपालांच्या दौऱ्यावर काय म्हणाले?
उल्लेखीय बाब म्हणजे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याचे ठरवले. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, नेत्यांच्या दौऱ्यांमुळे धीर मिळतो. पण, शासकीय यंत्रणांचे काम देखील वाढते हे तितकेच खरे आहे. दौऱ्यांमुळे यंत्रणांनाच त्रास होतो. ठिक आहे‌ राज्यपाल जात आहेत. त्यांचे केंद्राशी चांगले संबंध असल्याने ते अधिक मदत आणू शकतात. केंद्राकडून मदत मागवण्यासाठी राज्यपालांचा उपयोग व्हावा असे शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...