आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीमावादावरुन राज्यात वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. मिटकरी म्हणाले की, सुरत मार्गे गुवाहाटी जाणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो महाराष्ट्र संकटात आहे ,हिंदुत्व धोक्यात आहे, हिम्मत दाखवा ,बेळगाव मार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
मिटकरींचे ट्विट काय?
आमदार मिटकरी म्हणाले की, सुरत मार्गे गुवाहाटी जाणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो ! महाराष्ट्र संकटात आहे ,हिंदुत्व धोक्यात आहे हिम्मत दाखवा ,बेळगाव मार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच असे आव्हान मिटकरी यांनी दिले आहे.
नेमका वाद काय?
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या 40 गावांनी आम्हाला कर्नाटकमध्ये घ्या, असा ठराव 2012 मध्ये केला होता. पाणीप्रश्नाला कंटाळून या गावांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. या ठरावाचा आम्ही आता गांभीर्याने विचार करत आहोत. सांगतली जिल्ह्यातल्या गावांवर दावा सांगणार आहोत, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. यावर अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ठोस भूमिका जाहीर केली नाही, यामुळेच मिटकरींना शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
फडणवीसांचे उत्तर
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दाव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही बोलले नाही. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातले एकही गाव कुठेही जाणार नाही. उलट आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढू आणि बेळगाव, निपाणी, कारगाव ही गावे मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सीमावादामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.