आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक माझे सांगाती:राजीनामा फेटाळल्याचे कळवले, पण शरद पवारांनी वेळ मागितला; प्रफुल्ल पटेलांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने एकमताने फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती करणार आहेत, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी आपल्या निर्णयासाठी थोडा वेळ हवा असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पटेल पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर गोंधळाचे आणि असंतोषाचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू, असे कालच शरद पवारांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर समितीची आज बैठक झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे शरद पवारांचा राजीनामा फेटाळला गेला.

LIVE

- राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक झाली. सर्वांशी चर्चा करून समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला. दरम्यान, पवारांना समितीचा निर्णय कळवण्यात आला आहे. या ठरावावर विचार करण्यास आणखी वेळ हवा असल्याचे सांगितले असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सांगितले.

- आम्हाला दिलेले काम आम्ही केले आहे, शरद पवारांनी आम्ही विनंती केली असून आता ते काय निर्णय घेता यासाठी आपण त्यांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

-जयंत पाटील म्हणाले की, समितीच्या निर्णयासह कार्यकर्त्याच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या आहेत. देशभरातील नेतेे यांचे मतही आम्ही पवारांच्या कानावर टाकली असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.

- राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्याह इतर नेते सिल्व्हर ओकवर पोहचले आहेत. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना राजीनामा नामंजूर केल्याची माहिती देणार. कार्यकर्त्यांचा भावना कळवणार.

- प्रफुल्ल पटेल आणि आमचे नेते शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यांना समितीचा निर्णय कळवणार आहेत. - जयंत पाटील

- शरद पवारांनी दिलेला राजीनामा आम्ही नामंजूर करत आहेत. त्यांनी पदावर कायम रहावे, अशी विनंती करत आहोत. देशातले सगळे नेते इथे आलेत. त्यांना आमचा निर्णय, भावना मान्य करावाच लागेल. - छगन भुजबळ

- शरद पवार यांचा राजीनामा समितीने एकमताने नामंजूर केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच पवार यांनीच अध्यक्षपदी रहावे अशी विनंती करणार असल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यर्त्यांनी जल्लोष केला.

- शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र, एकमताने हा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. त्यांनी पक्षाध्यपदी रहावे अशी विनंती केली आहे. - प्रफुल्ल पटेल.

- समितीने या बैठकीत एक ठराव सर्वानुमते पारित केला आहे. तो ठराव मी वाचून दाखवणार आहे. - प्रफुल्ल पटेल.

- शरद पवार यांनी आम्हाला कोणालाही विश्वास न घेता निर्णय जाहीर केला. समितीची बैठक पार पडली. - प्रफुल्ल पटेल.

- शरद पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद राज्यभर, देशात आणि गावागावात पडलेले दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात वेदना, दुःख, नाराजी आहे. - प्रफुल्ल पटेल.

- शरद पवारांचा अनुभव आणि त्यांचा व्याप देशाच्या प्रत्येक राज्यात दिसत आहे. - प्रफुल्ल पटेल.

- शरद पवार यांची आज देशाला, राज्याला आणि पक्षाला खूप मोठी गरज आहे. तेच पक्षाचे आधारस्तंभ आहेत. - प्रफुल्ल पटेल.

- यशवंतराव चव्हाण केंद्रात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमानंतरही पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असे आम्ही साकडे घातले. - प्रफुल्ल पटेल.

- शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे आम्ही सगळेच स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. पवार साहेब असा निर्णय जाहीर करतील. - प्रफुल्ल पटेल.

- प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद सुरू. आतापर्यंत काय-काय झाले, पवारांचा राजीनामा ते समितीची स्थापना हा इतिहास सांगितला.

- मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू. शरद पवारांनी अध्यक्ष रहावे, असे साकडे.

- शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

- शरद पवार थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात येण्याची शक्यता.

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न सुरू.

- कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या भावुक झालेल्या कार्यकर्त्याला इतरांनी रोखले.

- मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला.

- समितीची शिफारस शरद पवारांना कळवणार. पवारांनी समितीचा निर्णय यापूर्वीच मान्य असल्याचे म्हटले आहे. आता ते काय निर्णय घेतील, याकडे लक्ष आहे.

- शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारच राहणार अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला मोठा निर्णय.

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पवारांचा राजीनाम्यावर बैठक सुरू झाली आहे. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सर्व नेतेमंडळी उपस्थित आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू. प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. त्यातला पहिला प्रस्ताव शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम रहावेत. तर दुसरा प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा आहे.

- शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावे, पहिला पर्याय आहे. त्यांनी नकार दिल्यास सुप्रिया सुळे अध्यक्ष असतील. शिवाय शरद पवारांकडे तहहयात अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता.

- शरद पवारांनी अध्यक्षपद स्वीकारलेच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पर्याय तयार असल्याचे समजते.

- विरोधीपक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आहेत.

- राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी याठिकाणी सुरू आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी. वाचा सविस्तर

- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, अनिल देशमुख बैठकीसाठी पोहोचले आहेत.

- खासदार सुप्रिया सुळे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पोहोचल्या आहेत.

- जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी पहिल्या क्षणापासून बोलत आहे की ज्या अपत्याला शरद पवारांनी जन्म घातला आहे त्याला ते आता वाऱ्यावर सोडू शकत नाही.

- धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील बैठकीला पोहोचले आहेत.

- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे.

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून दोन दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. नवीन नेतृत्वाच्या निवडीसाठी पवारांनी नेमलेल्या समितीची शुक्रवारी सकाळी मुंबईत बैठक होत आहे.

- बैठकीत ‘शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन तहहयात पक्षाध्यक्ष राहावे,’ असा एक ओळीचा ठराव ठेवला जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह व समितीच्या ठरावाचा मान राखून पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेतील, अशी शक्यता आहे.

- शरद पवारांनी राजीनामा दिल्याने राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन दोघेही खूश नाहीत. दोघांनीही शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून वडिलांना राजीनामा मागे घेण्याबाबत गुरुवारी सांगितले आहे. पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. अशी विनंती राहुल गांधी यांनी केलेली आहे.

- नेतृत्व निवडण्यासाठी 20 जणांची समिती पवारांनी ठरवली आहे. त्यात अजितदादा व धनंजय मुंडे सोडले तर सर्व जण पवारांचाच शब्द प्रमाण मानणारे आहेत. एकनाथ खडसे यांचा समितीत समावेश नव्हता. मात्र गुरुवारी अचानक त्यांचे नाव पवारांनी समाविष्ट केले.

संबंधित वृत्त

राजकारण:शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, धाराशीवमध्ये शेतकऱ्याचे चक्क चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी 3 दिवसांपासून कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु आहे. धाराशीवमधल्या शेतकऱ्याने तर शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी चक्क झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. वाचा सविस्तर