आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तातडीने अंमलबजावणी:विकिपीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दाखवले रिक्त, शरद पवारांच्या राजीनामा घोषणेनंतर बदल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही वेळात विकिपीडियावरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद रिक्त असल्याचा बदल करण्यात आला आहे.

लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे नाट्य पहायला मिळत आहे.

नेमके प्रकरण काय?

मुंबईतील लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळयात आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. तसेच यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या निर्णयाला जोरदार विरोध करत निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरत आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पवारांच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

अध्यक्षपद दाखवले रिक्त

शरद पवारांच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याच्या निर्णयावरून राज्यात राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडत असतानाच विकिपीडियाच्या राष्ट्रवादी काँग्रेच्या पानावर बदल केला आहे. यात पक्षाचे अध्यक्षाचे पद vacant करण्यात आले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

'लोक माझे सांगाती'चे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, कुठे थांबायच हे मला कळत. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.