आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार म्हणाले-चर्चेतूनच तोडगा निघेल:दोन वर्षांतच एसटीची अवस्था वाइट झाली, अर्थकारण सुधारायला हवेच पण पगाराचा मुद्दा मोठा असल्याने आधी त्यावर तोडगा काढू

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षापासून एसटीची वाइट अवस्था झाली आहे. संपाबाबत अनिल परब यांच्याशी मी चर्चा केली असून, चर्चेतून मुद्दा सुटू शकतो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन केले असता, तेव्हा ते बोलत होते. 2018 पासून राज्याच्या लाल परीची अवस्था बिकट झाली आहे. एसटीला कधीच राज्य सरकारचा आधार घ्यावा लागला नाही. असे देखील शरद पवार म्हणाले.

पुढे पवार म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा झाली असून, इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगारांचा मुद्दा मोठा आहे. त्यामुळे पगाराचा प्रश्न आहे तो भरून काढाला पाहिजे. तसेच एसटीचे अर्थकारण कशा प्रकारे सुधारता येईल, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. असे पवार म्हणाले.

एसटी विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयात असून, त्यावर मी काहीही बोलणार नाही, मात्र एसटीचे विलीनीकरण केल्यानंतर इतर महामंडळेदेखील विलीनीकरणाची मागणी करतील. असे विधान देखील पवारांनी केले आहे.

कृषी हा राज्याचा विषय

कृषी हा केंद्राचा नव्हे तर राज्याचा विषय आहे. केंद्राने राज्यांना विश्वासात न घेतला हे कायदे लागू केले होते. कोणत्याही राज्याची त्यात प्रतिक्रिया घेण्यात आली नव्हती. केंद्राने कृषी कायद्यांबद्दल घेतलेली भुमिका ही टोकाची असल्याचे मत पवारांनी दिले. ते पुढे म्हणाले की, अनेक राज्यांच्या निवडणुकी असल्याने मोदी सरकारने हे पाऊले उचललीत. गेल्या वर्षभर त्यांनी कृषी कायदे मागे घेतले नाही. मात्र निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी मोदी सरकारने हे कृषी कायदे मागे घेतले आहे. असे पवार म्हणाले.

महाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल

राज्यात विरोधात बसलेल्या भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार कोसळेल असे नेहमी विधाने करत असते. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेहमी आघाडीवर असतात. त्या वक्तव्याला देखील पवारांनी उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कालखंड पूर्ण करेल. असे विश्वास पवारांनी दाखवला आहे.

बातम्या आणखी आहेत...