आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं वावगं नाही:अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रीया, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''धर्मवीर म्हणा की, स्वराज्यरक्षक म्हणा. दोन्ही बिरुदावलीला वावगं नाही. धर्माच्या अ‌ॅंगलने म्हणाल तरीही हे ज्याचे त्याचे मत आहे. त्यावर आक्षेप नसावा. अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत दिली. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर की, स्वराज्यरक्षक म्हणावे यावरील वादावर त्यांनी पडदा टाकण्याचा आज पत्रकार परिषदेत प्रयत्न केला.

विधानभवनात अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक म्हणणे उचित ठरेल असे वक्तव्य केले होते. या व्यक्तव्यानंतर राज्यात भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी अजित पवारांचा निषेध केला. त्यानंतर या प्रकरणावर शरद पवारांनी आपली भुमिका आज जाहीर केली.

मला थोडी काळजी वाटते

शरद पवार म्हणाले, धर्मरक्षक याबाबतची जी काही तक्रार आहे की, त्याबद्दल मला थोडीसी काळजी वाटते. कारण ठाणे येथे जातो त्यावेळी धर्मवीर म्हणून काही नेत्यांचे नावे ऐकू येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळचे आमचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? संभाजी महाराजांवर जी आस्था आहे त्यानुसार ज्यांनी त्यांनी बोलावे. संभाजी महाराजांच्या महत्वाच्या कामाची नोंद घेतली ती महत्वाची आहे. राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी एक महत्वाचे काम केले, त्यामुळे त्यांना बिरुदावली लावली त्यात वावगं नाही.

मुळ मुद्दे डायव्हर्ट होताहेत

शरद पवार म्हणाले, अजित पवार काय म्हणाले हे मी टीव्हीवर पाहीले त्यानंतर मी यावर बोललो. पण जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मला माहीत नाही. राज्यातील मुळ गोष्टी महत्वाच्या आहेत. लोक अस्वस्थ आहेत. हे बाजूला ठेवून त्यापासून दुर सरकार नेत आहे. लोकांचे मुद्दे डायव्हर्ट केले जात असून लव्ह जिहादचा मुद्दाही त्यातूनच पुढे आलाय.

एकदाचे काय ते करुन टाका!

शरद पवार म्हणाले, देश आणि राज्याची सत्ता भाजपकडे आहे. त्यामुळे काय कायदा करायचा हे त्यांच्या हाती आहे. लोकांना विश्वासात घेऊन काय जे करायचे तो निर्णय घेऊन टाकावा. कुणाचाही विरोध नाही त्याला.

कोर्टाचा निर्णय मान्य करायला हवा

शरद पवार म्हणाले, नोटबंदीचा निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण मान्य करायला हवा. तेलंगणा राष्ट्रीय समिती भारतीय नाव धारण करुन महाराष्ट्रापासून कॅम्पेनची सुरुवात करीत आहेत. ज्याला त्याला विस्तार करण्याचा अधिकार आहे.

नड्डांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि त्यांनी मिशन 45 केले. यावर शरद पवार म्हणाले, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी मिशन 48 करायला हवे होते. कारण महाराष्ट्रात 48 जागा आहेत. महाविका आघाडीवर त्यांनी आरोप केला हे वाचण्यात आले. ते जे काही म्हणतात, आत्ताच त्यांच्या राज्यात निवडणुका झाली. यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यातही निवडणूक होती. त्यांना सत्तेतून लोकांनी मतदान करुन दुर केले. केंद्रात त्यांची सत्ता असतानाही त्यांना हरीयाणात सत्ता आणता आली नाही. ते दुसऱ्या राज्यात काय बोलतात याला महत्व नाही.

बातम्या आणखी आहेत...