आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''राज्यपालाची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहीले आहे. मी त्यावर जाहीरपणे आधीच बोललो आहे. त्यांचे नाव महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात राहील. '' अशी प्रतिक्रीया देत शरद पवारांनी राज्यपालांची नियुक्ती, राज्यपालांचे वर्तन आणि त्यांची सत्ताधाऱ्यांना असलेली साथ याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली.
लोकशाहीसाठी एकत्र येण्याची गरज
शरद पवार म्हणाले, आज देशात जी परिस्थिती आहे हे पाहता देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. मिळून काम केले तर देश अधिक बळकट होईल. कर्नाटकची जनता भाजपचा पराभव करेल. नवीन सेक्यूलर सरकार बनवेल.
नितीशकुमार, आमच्यात एकमत
शरद पवार म्हणाले, देशातील विविध भागात हीच स्थिती आहे. या स्थितीत आणखी वाढ आणि यश मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. नितीश कुमार यांनी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आम्हीही याच पद्धतीने पुढे जाण्याची गरज असल्याचे मत आमच्यांत झाले. नितीश कुमार यांनी हे पाऊले उचलली त्याचे मी स्वागत करतो.
विरोधकांची मोट बांधतोय
शरद पवार म्हणाले, जी आघाडी तयार होईल ती होणारच आहे. याशिवाय काही पक्षांशी चर्चा करीत आहोत. तसे एकसंघ झाल्यानंतर नावही जाहीर करू. एकदम पूर्ण ताकदीने आम्ही पुढे जाऊ. जेही होईल ते चर्चेने होईल. जी बैठक होईल याबाबत आम्ही वेळेवर सर्व सांगू. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना, काॅंग्रेस आणि अन्य पक्षांसोबत आम्ही आहोतच.
ठाकरेंच्या राजीनाम्यावर चर्चेत अर्थ नाही
ठाकरेंच्या राजीनाम्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही. माझ्या पुस्तकात मी त्याबद्दल लिहिले आहे. सत्तेचा गैरवापर हा सातत्याने केला जातो हे त्याचेच उदाहरण आहे. त्यातूनच जयंत पाटील यांना इडीची नोटीस आली आहे. देशपातळीवर आम्ही विरोधकांची मोट बांधत आहोत. आधी एकत्र येऊ नंतर चेहरा ठरवू.
राज्यकर्त्यांवर कोर्टाचे ताशेरे
शरद पवार म्हणाले, राज्यकर्त्यांबद्दल तीव्र भूमिका आज कोर्टाने मांडली. काही निकाल अजून यायचे आहेत. महत्वाचा मुद्दा यायचा त्यात अपात्रतेचा विषय आहे. अध्यक्ष न्यायाची भूमिका घेतील. त्यांनी चौकटीत काम करावे. सुप्रिम कोर्टाने हे सांगितले की, विधानसभा अध्यक्ष स्वायत्त आहेत त्यांनी लोकशाहीला, घटनेला धरुन काम करायला हवे.
आता जोमाने काम करू
शरद पवार ठाकरेंनी राजीनामा दिल्याबाबत मी पुस्तकात स्पष्ट लिहीले आहे. जे झाले ते झाले. उद्धव ठाकरे आणि आम्ही तसेच काॅंग्रेस जोमाने काम करू. राज्यपाल इथे असताना त्यांचा अनुभव घेतल्यानंतर एक स्टेटमेंट केले होते. राज्यघटनेत राज्यपाल एक संस्था आहे, या संस्थेचा गैरवापर किती झाला हे कोर्टाने सांगितले. सुदैवाने इथे ती व्यक्ती नाही त्यामुळे जास्त बोलण्याचे कारण नाही.
भाजपविरोधात प्रचार सोपा होईल
शरद पवार म्हणाले, राजकीय विचारांच्या लोकप्रतिनिधी आणि संस्थेला त्रास होईल हे भाजपकडून केले जात आहे. त्याचे उदाहरण राज्यपालावरुन स्पष्ट दिसते. कोर्टाच्या निर्णयामुळे भाजपविरोधात प्रचार करणे सोपे होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.