आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांबाबत केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल:शरद पवार, म्हणाले- केंद्र, राज्य सरकारची भूमिका बघ्याचीच

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या पद्धतीचे विधान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवछत्रपतीबद्दल केले ते चुकीचे होते. या मुद्द्यावर केंद्र आणि राज्यसरकारने बघ्याची भूमिका घेतली. यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, परंतु मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यावा लागेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

परवानगीचे आश्चर्य नाही

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाला​​​​​​परवानगीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक संकेत दिले होते. मोर्चा हा लोकशाहीचा अधिकार आहे असे ते म्हणाले, त्यामुळे मोर्चाला परवानगी दिल्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. राज्यात महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये राग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत जबाबदार लोकांनी केलेली वक्तव्ये सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल.

केवळ बघ्याची भूमिका

शरद पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली.

उदयनराजेंची भूमिका चांगली

शरद पवार म्हणाले, उदयनराजेंची भूमिका चांगली घेतली. त्याचे आम्हालोकांना समाधान आहे. राज्यसरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायची ती घेतली नाही. दोन्ही सरकारची भूमिका बघ्याची आहे त्याबद्दल लोकांच्या मनात संताप आहे.

भीक मागितल्याचे वक्तव्य संतापजनक

महापुरुषांबद्दल जी वक्तव्ये केली त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. शाळा काढण्यासाठी या महापुरुषांनी भीक मागितली हे वक्तव्य संतापजनक आणि दुर्दैवी आहे. याबाबत राज्यकर्त्यांना तारतम्य नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांना जेवायचा प्रश्न आला तेव्हा स्वत:च्या पत्नीचे दागिने विकले ते काय भीक मागून नव्हे.

बातम्या आणखी आहेत...