आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते, त्यानंतर त्यांनी हद्दच केली. गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून कांगावा केला, अशी टीका शरद पवारांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाहीच. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वापरलेला शब्द चुकीचाच होता. यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी कांगावा करत आपण सामान्य कुटुुंबातून आलो आहोत म्हणून हे सगळे सुरू आहे, असा राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा कुणी 5 वर्षे मंत्रिमंडळात मंत्री होतात पक्षाचे अध्यक्ष होतात आणि आताही मंत्री आहात आणि एखाद्या सामान्य कुटुुंबामधील व्यक्ती ही सत्तेच्या शिखरावर जाते ही काही केवळ तुमच्या बाबतील घडलेली नाही, असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात देता येतील, असा टोलाही त्यांनी हाणला.
शाईफेक चुकीचीच
मात्र, त्यांनी हा कांगावा कधी केला नाही मी या कुटुंबात जन्माला आलो. हे घडले नसते तर चांगले झाले असते, या प्रकरणाचे मी समर्थन करत नाही, पण शाईफेक करणे ही भूमिका आपण कधी घेणार नाही. आपणही अशी भूमिका घेऊ नये, असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.
पंतप्रधान मोदींवर टीका
शरद पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांनी आपण देशाचे नेतृत्व करतोय याची जाणीव ठेवायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, सरकारी कार्यक्रमात त्यांनी एखाद्या पक्षाचे नेते म्हणून नाही, तर देशाचे पंतप्रधान म्हणून करायला हवे. निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तरीसुद्धा नेहरूंनी विरोधकांवर टीका केली नाही. विरोधक ही लोकशाहीची संस्था आहे. हे सर्व पंतप्रधानांनी पाळले. मात्र, आज हे सूत्र पाळले जात नाहीये असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
विकासाला विरोध नाहीच
खासदार शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच समृद्धी महामार्गाला विरोध केला नाही. केवळ आमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी मी स्वत: तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना केली, पण लगेच सांगायचे की विरोधकांचा प्रकल्पाला विरोध होता हे चुकीचे आहे, असे खडेबोलही पवारांनी सुनावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.