आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपात आल्यावर कुणाची चौकशी बंद झाली?- देवेंद्र फडणवीस:तुमच्या शेजारी बसणाऱ्या ठाण्यातील नेत्याकडे पाहा- शरद पवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील प्रमुख 9 विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर जे नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचे प्रकरण नंतर थंडबस्त्यात गेले, असा आरोपही पत्रात केला आहे.

फडणवीस, पवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

यावरुन भाजपमध्ये आल्यानंतर कुणाची चौकशी बंद झाली, याचे एक तरी उदाहरण दाखवून द्यावे, असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. त्यावर शरद पवार यांनी खोचक प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांना उद्देशून शरद पवार म्हणाले, तुमच्या शेजारीच ठाण्यातील एक नेते बसतात. त्यांचेच प्रकरण पाहा. या नेत्याचे नाव घेऊन मी त्याला अवास्तव महत्त्व देऊ इच्छित नाही. मात्र, आणखीही एक, दोन उदाहरणे सांगता येतील. दरम्यान, शरद पवार यांचा रोख आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तर नाही ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी ईडीने प्रतास सरनाईक यांची मालमत्ता जप्त करत त्यांना नोटीसही बजावली होती. मात्र, नंतर शिंदे गटासह प्रताप सरनाईक भाजपसोबत गेल्यानंतर त्यांचे प्रकरण पुढे सरकलेले नाही.

पत्र लिहून कारवाई थांबणार नाही

दुसरीकडे, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीय यांची अटक चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे मिळवणे बंद केल्यानंतरच कारवाई थांबेल. तसेच, भाजपमध्ये आल्यावर कुणाची चौकशी बंद झाली, याचे एक तरी उदाहरण दाखवा, असे आव्हान, देवेंद्र फडणवीसांनी दिले.

याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या बाजुलाच बसणारे एक ठाण्यातील नेते आहेत. त्यांची फाईल एकदा ओपन करुन पाहा. केवळ हे एकच नव्हे तर आणखीही अशी उदाहरणे देता येतील.

सिसोदीयांची अटक चुकीची

पुढे शरद पवार म्हणाले, अलिकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी विरोधी पक्षातील अनेकांवर कारवाई केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही ईडीने अटक केली आहे. याच सिसोदीयांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम काम केले. देशात आणि देशाच्या बाहेरच्या लोकांनी सिसोदीया यांच्या कामाला मान्यता दिली. मात्र, सिसोदियांवर अबकारी धोरणात गैरव्यवहाराचा आरोप करुन गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीत दारुवर कर अधिक होता. त्यामुळे लोक चोरून दारू आणायचे. त्यामुळे सिसोदिया यांनी कर कमी केला. त्यामुळे चोरीची आयात थांबली. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पंतप्रधानांनी विचार करावा

शरद पवार म्हणाले, देशातील भाजपविरोधी पक्ष सत्तेत असलेली 8 राज्ये आहेत. या 8 राज्यात वारंवार ईडी, सीबीआयच्या धाडी पडत आहेत. काही ठिकाणी तर ज्यांच्यावर खटले भरले ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती आम्ही पत्रात दिली. त्यावर फेरविचार करावा, अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना केली आहे.

संबंधित वृत्त

सिसोदिया प्रकरणी 9 विरोधी नेत्यांचे PM मोदींना पत्र:म्हणाले - अटकेमुळे भारतीय लोकशाहीचे हुकूमशाहीत रुपांतर झाल्याचे सिद्ध झाले

दिल्लीचे उपमुख्यंमत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेप्रकरणी विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या नेत्यांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. या पत्रात म्हटले आहे की, मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे भारताचे एका लोकशाही देशातून हुकूमशाही शासन पद्धतीत रुपांतर झाल्याचे सिद्ध होते. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...