आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पाॅवर'फूल:राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी कोण? पवार म्हणाले - पक्षात कोणतेही पद, धुरा सांभाळणारे नेतृत्व निर्माण होणे आवश्यक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे.'' असे वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यामुळे पुढचा राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मी जोमाने काम करणार

शरद पवार म्हणाले, माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.

आपण माझे सांगाती राहिलात

शरद पवार म्हणाले, आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद !

पवारांना सर्व नेते घरी भेटले

जयंत पाटील म्हणाले की, माझीच नाही तर देशाच्या कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे. धनंजय मुंडे असोे की, कुणी सर्व इथे उपस्थित असू शकत नाही. ते पवारांना सकाळीच घरी भेटले होते. मला येथे यायला उशीर झाला.

उत्तराधिकारी मी ठरवू शकत नाही - जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, उत्तराधिकारी असा शब्द त्यांनी वापरलेला नाही. पक्षाची जबाबदारी अधिक चांगली सांभाळण्यासाठी भविष्यात चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांंसह नेत्यांची मागणी त्यांनी मान्य केली. त्यांनी सर्वांचा आग्रह मान्य केला. शरद पवारांना राजीनामा मागे घ्या ही मागणी करताना अजित पवार हेही आमच्यासोबत होते. उत्तराधिकारी कोण हे मी निर्णय घेण्याची गरज नाही लोक ठरवतील.