आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेनेने भाजपसोबत जाउ नये अशी माझी आधीपासूनच इच्छा होती. शिवसेना जेव्हा जाणार असे दिसले तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले होते की आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरुन पाठिंबा देतो. अर्थातच माझा हेतू होता की शिवसेनेने भाजपपासून दूर राहावे. असे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राउत यांनी पवारांच्या मुलाखतीचा तिसरा भाग प्रसिद्ध केला. त्यामध्येच पवारांनी जुन्या वक्तव्यांना उजाळा दिला.
शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये असे पहिल्यापासून वाटत होते. त्यांनी सरकार बनवले आणि चालवले, यात वाद नाही. पण भाजपच्या हातातले सरकार कधीच सेनेच्या हिताचे नसते. दिल्लीत सत्ता त्यांच्याच हातात. राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री यांच्या हातात. शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे, हेच त्यांना मुळात मान्य नाही. त्यामुळे आज न उद्या ते निश्चितपणे या सर्वांना धोका देणार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावे म्हणून मी तसे बोललो, आमची ही एक राजकीय चाल होती, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, "शिवसेनेला बरोबर घ्यायचे नाही. तुम्ही त्यात येऊन स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या, असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते. आमच्यातील काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले. बोलले नाही हे खरे नाही, ते बोललेच.. एकदा नाही.. दोनदा नाही.. तीनदा बोलले… आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की पंतप्रधान आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे प्राईम मिनिस्टरने यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.