आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sharad Pawar Parth Pawar Dispute Latest News Updates : Parth's Soon To Be Rehabilitated Within The Party, A Phone Conversation Between Sharad Pawar And Ajit Pawar

पवार कुटुंबातील वादावर पडदा:पार्थचे लवकरच पक्षांतर्गत पुनर्वसन, शरद पवार व अजित पवार यांच्यात फोनवर चर्चा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजोबांच्या टीकेमुळे पार्थचे राजकीय भवितव्य कोंडीत सापडले आहे

पार्थ पवारप्रकरणी पवार कुटुंबातील वादावर तात्पुरता पडदा पडला असल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कडवट प्रतिक्रियेनंतर नाराज झालेल्या पार्थची समजूत काढण्यात यश आले असल्याचे सांगितले जाते. यासाठी शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस अजित पवार यांच्या कुटुंबीयांची बैठक झाली. त्यात आजोबा-नातवाच्या वादावर कायमचा पडदा टाकल्याचे कळते. आजोबांच्या टीकेमुळे पार्थचे राजकीय भवितव्य कोंडीत सापडले आहे. मात्र, पार्थचे लवकरच पक्षांतर्गत पुनर्वसन केले जाईल, असे ठरल्याचे कळते.

पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी बारामतीत अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांच्या घरी रात्री बैठक झाली. या वेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढल्याचे समजते. या बैठकीला अजित पवार, पार्थच्या आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार आदी हजर होते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पार्थने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पक्षाच्या विरोधात मागणी केल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. नाराज पार्थ पवार हे पक्ष व कुटुंबीयांविरोधात जाऊन मोठा निर्णय घेणार अशा चर्चा होत्या. मात्र, सध्या तरी या चर्चांना विराम मिळाला आहे. पार्थच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मी नातवाच्या भूमिकेला काडीची किंमत देत नाही,’ असे जाहीरपणे म्हटले होते. त्यानंतर पार्थ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, आता पार्थ प्रकरणावर पवार कुटुंबीय आणि पक्षातीलसुद्धा कोणीच बोलणार नसल्याचे समजते.

पवार कुटुंबीय पुन्हा मुंबईकडे रवाना

पार्थ यांची नाराजी तसेच इतर मुद्द्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची रात्री उशिरा फोनवर चर्चा झाली, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. वाद निवळल्याने शरद पवार पुण्याहून रविवारी मुंबईत पोहाेचले, तर बारामतीहून अजित पवार आणि कुटुंबीय मुंबईत येण्यास निघाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...