आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sharad Pawar Press Conference | Sharad Pawar Big Statment For Vidhansabha Election 2022, Ncp And SPA Uttar Pradesh Assembly Election 2022 | Marathi News

पवारांचे मिशन इलेक्शन:मौर्य भाजपसोडून सपात गेले, आणखी 13 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; भाजपला गळती लागणार-पवार

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढेही उत्तर प्रदेशात भाजपला आणखी गळती लागणार आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मौर्य यांच्याकडे चार विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. योगी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मौर्य हे श्रम आणि सेवायोजन व समन्वय मंत्री होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची माहिती देखील शरद पवारांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी 3 राज्यात राष्ट्रवादी युती करुन निवडणूक लढवणार असल्याचे देखील शरद पवार म्हणाले. त्यासाठी आपण लवकरच उत्तर प्रदेश दौरा देखील करणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आगामी विधानसभा लढवणार आहोत. असे भाष्य शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केले.

भाजपला गळती लागणार
आज भाजपचे नेते तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का पोहोचला आहे. आणखी भाजपते 13 आमदार भाजप सोडणार असून, यापुढे भाजपला गळती लागणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

लोकांना बदल हवा आहे
उत्तर प्रदेशातील लोकांना आता बदल हवा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार असून, नक्कीच परिवर्तन घडेल असे पवार म्हणाले. उत्तर प्रदेशात अल्पसंख्याक समाज असुरक्षित असून, मुद्दामुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात संप्रदायाचे विचार रुजवण्याची गरज आहे. असे देखील पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...