आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणातील अनेक मुद्दयांना हात घातला आहे. यासोबतच महाविकास आघाडीविषयी होणाऱ्या अनेक चर्चांविषयी स्पष्टकरणही दिले आहेत. यासोबतच त्यांना कोरोना काळात बाळासाहेब ठाकरेंची आठवण आली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मित्रासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील फरही त्यांनी सांगितला.
पुढे शरद पवार म्हणाले की, मला दोन महिने लॉकडाऊन होतं. या काळात मी घरात बसून होतो. माझ्यासारख्याला या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण अशासाठी येत होती की, आपण घरातून तर बाहेर पडायचं नाही, पण बाकीची कामं, ज्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेला जाण्याच्या प्रवासाची तयारी आपण करायला हवी. ते ज्या पद्धतीने बाळासाहेब करायचे त्याची आठवण या काळात आली' असं पवार म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले की, 'बाळासाहेबांची कामाची पद्धत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत असल्याचं ते संजय राऊतांना म्हणाले. बाळासाहेब हे काय दिवसभर घराच्या बाहेर पडून कुठे गेलेले असायचे असे नाही. अनेक वेळा ते दिवस दिवस घरातच वेळ घालवत असतं. पण ते घरात असतानासुद्धा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करत असतं. यासोबतच ते आलेल्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी शिकवलं होतं असं मला वाटतं. असं म्हणत पवारांनी ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.
पवारांनी सांगितला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला फरक
खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीतील फरक विचारला. याचे उत्तर देताना पवार म्हणाले की, 'मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाउनचा घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, मात्र त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय असल्याचं पवार म्हणाले. तसेच निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत हा फरक आहे आणि तसा तो राहणारच' असं मत त्यांनी दोन्ही नेत्यांबद्दल व्यक्त केलं
बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, 'बाळासाहेब हे प्रत्यक्ष सत्तेत नव्हते. मात्र तरीही ते सत्तेच्या पाठीमागचे एक प्रमुख घटक होते. त्यांच्या विचाराने सत्ता महाराष्ट्रात आली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितले आहे. आजची सत्ता ही विचाराने आलेली नाही. मात्र सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या संबंधीची जबाबदारी आताचे मुख्यमंत्री ठाकरे यांची आहे. हा फरक महत्त्वाचा असल्याचंही पवार म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.