आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय घेणार निर्णय?:शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांची NCP कार्यालयाबाहेर जोरदार नारेबाजी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यभरात नाट्यमय घडामोडींना वेग आला असताना आज पवारांच्या मुंबईच्या कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली.

आज राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी 15 सदस्यीय समितीची बैठक होत आहे. दरम्यान, शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

'आदरणीय साहेब राजीनामा मागे घ्या' अशा अर्थाचे बॅनर हातात धरत मुंबईच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काय आहे प्रकरण?

लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते, नेत्यांनी पवारांच्या निर्णयाचा विरोध करत राजीनामा मागे घ्या असा धोशा लावत जोरदार आंदोलन केले.

आज राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या नव्या नेतृत्व निवडीसाठी पवारांनी नेमलेल्या बैठकीसाठी पक्षाचे नेते दाखल होत असतानाच दुसरीकडे पवारांच्या मुंबईच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी होत असून पवारांनी राजीनामा मागे न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

कधी आहे बैठक?

राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या अध्यक्षपदासाठी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात 15सदस्यीय समितीची बैठक होणार आहे. आज 11 वाजता वाय बी चव्हाण सेंटर याठिकाणी ही बैठक होणार आहे. शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच रहावेत यासाठी मुंबईच्या कार्यालयाबाहेर राज्यभरातून कार्यकर्ते जमले आहेत. कार्यकर्त्यांनी बॅनर, पोस्टरसह पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

संबंधित वृत्त

घडामोडी:राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार? 11 वाजता बैठक, 15 सदस्यीय समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल -शरद पवार

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी 15 सदस्यीय समितीची बैठक होत आहे. वाचा सविस्तर