आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल अचानक आपण निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहिर केला. आणि एरव्ही भक्कम वाटणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. यावेळी शिवसैनिकांना 45 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कशी परिस्थिती ओढवली होती. त्या घटनेची आठवण झाली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिकांनी 'मातोश्री'कडे धाव घेत आक्रोश केला होता. शिवसैनिकांनी भर पावसात मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांच्या भावनांचा आदर राखत आपली निवृत्तीची घोषणा मागे घेतली होती. आता असेच काहीसे शरद पवार यांच्याही बाबतीत घडते की काय याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सर्वांना धक्का बसला
63 वर्षे संसदीय राजकारणात ‘अजिंक्य’ राहिलेले 83 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच नवा अध्यक्ष निवडीसाठी त्यांनी समितीही जाहीर केली. ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवारांनी ही घोषणा करताच सर्वांना धक्काच बसला.
बाळासाहेबांनी कधी केली होती घोषणा?
असेच काहीसे घडले होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी. 1978 आणि 1992 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहिर केला होता. आणि शिवसैनिक कोलमडले. पहिल्यांदा 1978 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने पूर्ण ताकदीने 117 उमेदवार मैदानात उतरवले. पण या निवडणुकीत फक्त 21 उमेदवारच निवडून आले होते. यावेळी बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर मेळावा बोलावला आणि राजीनामा देत असल्याची घोषणा केली. या निर्णयाला प्रचंड प्रमाणात विरोध झाला. आणि बाळासाहेबांना निर्णय मागे घ्यावा लागला.
निर्णय मागे घ्यावा लागला
1992मध्ये बाळासाहेबांवरच घराणेशाहीचा आरोप झाला. माधव देशपांडे या शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ते केवळ त्यांच्या मुलांनाच मोठे करत असल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे व्यथित होऊन बाळासाहेबांनी 'सामना' मुखपत्रात 'शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा कुटुंबासह अखेरचा जय महाराष्ट्र' असे निवेदन प्रसिद्ध केले. यावेळी मुसळधार पाऊस सुरु होता. मुसळधार पावसात शिवसैनिक जमायला सुरुवात झाली. यावेळीही बाळासाहेबांना निर्णय मागे घ्यावा लागला. आता शरद पवारही आपला निर्णय मागे घेणार कि कायम ठेवणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
संबंधित वृत्त
नेतृत्वाची कमी:संघर्ष न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने 'मविआ'ची सत्ता गेली, ‘लोक माझे सांगाती’त शरद पवारांचे परखड मत
अंसतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात व्यक्त केले आहे. 'लोक माझे सांगाती'तून पवारांनी उद्धव ठाकरे कुठे कमी पडले हे थेट सांगितले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.