आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या.. ‘पॉवर प्ले’चा अर्थ:मविआत फूट अटळ, राष्ट्रवादीचा सत्तेजवळ जाण्याचा मार्ग मोकळा; कुणावर काय परिणाम?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस : नवा पक्षाध्यक्ष मिळेल, भाजपशी युतीची शक्यता आणखी बळावली
अर्थ : सुप्रिया की अजित यापैकी होईल अध्यक्ष. शरदराव यांची पसंती सुप्रियाला. समितीही तसा कौल देऊ शकेल.
परिणाम : पवारांनी बाजूला होत भाजपशी युतीचा अडसर केला दूर. केंद्र व राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग शक्य.

महाविकास आघाडी : वज्रमूठ ढिली पडेल, उर्वरित दोन्ही पक्ष एकाकी पडू शकतील
अर्थ : पवार हेच आघाडीचे आधारस्तंभ होते. राष्ट्रवादी आता वेगळ्या भूमिकेत गेली तर मविआत फूट अटळ.
परिणाम : मोदींशी लढण्याच्या मनसुब्यावर पाणी पडेल, भाजपविरोधात राज्यात प्रबळ विरोधक राहणार नाहीत.

भाजप : राष्ट्रवादी व मविआत फुटीचे मनसुबे यशस्वी, पुन्हा सत्तेत येण्याच्या आशा पल्लवित
अर्थ : ‘शिंदे पॅटर्न’ फसला तर अजितदादांचा ‘बी प्लॅन’ वापरण्याची भाजपची रणनीती यशस्वी होऊ शकते.
परिणाम : शिंदे, राष्ट्रवादी सोबत असतील तर लोकसभा, विधानसभा एकहाती जिंकण्याचे मिशन फत्ते होऊ शकेल.

उद्धवसेना : भाजपविरोधी लढाईचे बळच गळून पडले, उद्धव ठाकरे पडले एकाकी
अर्थ : राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व उद्धवसेनेसोबत राहण्याची शक्यता कमीच. काँग्रेसही सेनेची साथ सोडून जाईल.
परिणाम : जनतेची सहानुभूती व मविआच्या एकजुटीने पुन्हा सत्तेत येण्याचे उद्धव यांचे स्वप्न धुळीस मिळू शकेल.

कुणावर काय परिणाम?
उद्धव ठाकरे
: शरद पवार यांचे भक्कम पाठबळ यापुढे राहणार नाही. त्यामुळे मविआचे नेतृत्व सोडा, आघाडी टिकवून ठेवणे तसेच उरलेली शिवसेना सांभाळणे कठीण.

अजित पवार : शरद पवारांची मान्यता असेल तरच राष्ट्रवादीचे अध्यक्षपद मिळू शकेल. सीएम होण्याची महत्त्वाकांक्षाही पूर्ण करता येईल. पण पवारांची संमती नसेल तर पुन्हा झगडण्याची वेळ येईल.

संजय राऊत : शरद पवार यांचा मोठा आधार गमावल्याने राजकीय वर्तुळात महत्त्व कमी होईल. उद्धवसेनेतही वजन कमी होण्याची शक्यता.

सुप्रिया सुळे : वडिलांच्या गैरहजेरीत पक्षावर कमांड मिळवण्याचे आव्हान. पण केंद्रात मंत्रिपद मिळण्याची संधी. अजितदादांकडे नेतृत्व गेल्यास मात्र तडजोडीच्या भूमिकेत राहावे लागेल.

देवेंद्र फडणवीस : विरोधकांची फळी मोडून काढणारा मातब्बर नेता म्हणून नवी ओळख मिळेल. भाजपचा ‘नंबर वन’ दर्जा कायम ठेवून पुन्हा मुख्यमंत्रिपद शक्य.

एकनाथ शिंदे : भाजपला दुसरा पर्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिंदेंचे महत्त्व कमी होईल. अपात्रतेची कारवाई होऊन पद गेले तर बंड करून सोबत आलेले आमदार सांभाळणे कठीण जाईल.

नाना पटोले : आघाडी मोडल्यास काँग्रेस पुन्हा सत्तेत येणे अशक्य. नानांच्या नेतृत्वावर पक्षातूनही आक्षेप. त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्षपद निवडणुकीपूर्वी जाऊ शकते.