आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांनीच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. याचे ते साक्षादार आहेत. जे शरद पवार शिवसेनेच्या मुळावर उठले, त्यांना साथ देत त्यांचेच राऊतांनी ऐकले याचे दु:ख आहे. यात उद्धव ठाकरेंचा दोष नाही अशी भावना शिवसेनेतून नुकतेच शिंदे गटात गेलेले नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
मी त्यांना म्हटले तोंड बंद ठेवा
शिवसेनेत असंतोष होतो, सेना फुटते पण राऊत काहीच बोलत नाही. जेव्हा आमदार गुवाहाटीला जातात तेव्हा ते बोलत सुटले. मी त्यांना थांबा तोंड बंद ठेवा म्हटलो पण ते ऐकतील तर राऊत कुठले. राष्ट्रवादीशी युती संजय राऊतांनी घडवून आणली. माझे प्रयत्न भाजपसोबत जाण्याचे होते, पण राऊतांचे शरद पवारांसोबत जाण्याचे प्रयत्न सफल झाले. मी मातोश्रीवरुन परतलो.
किती दिवस फसवणार?
रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा गैरफायदा राष्ट्रवादीने घेत निधी वाटपात दुजाभाव केला. तेव्हा संजय राऊत कुठे होते? ते का बोलले नाही. पक्ष संपला तरी चालेल पण शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करणार नाही. लोकांना किती दिवस फसवाल?, शिवसेना संपवण्याचे काम त्यांनी केले तेच याचे साक्षीदार आहेत. मांजर डोळे झाकून दुध पित असेल तरी लोक पाहत असतातच ना.
अजित पवारांना रान मोकळे
रामदास कदम म्हणाले, संजय राऊतांना टीव्हीवर बोलताना लोक आता कंटाळले. राऊतांनी शिवसेना वाचवण्याचे काम केले नाही. त्यांच्याकडून ते झाले नाही. यात उद्धव ठाकरेंना दोष देणार नाही. ते आजारी होते, मंत्रालयात ते जात नव्हते, अजित पवारांना मोकळे रान मिळाले.
राऊत घाबरणारे नाही
रामदास कदम म्हणाले, मी दाव्याने सांगतो, संजय राऊत स्ट्राॅंग आहेत ते घाबरणारे नाहीत, ते ईडीला सामोरे जातील, ते सहकार्यही करतील. संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वांना ते उत्तरे देतात, मग ईडी-बीडी कसली काय आहे?
राऊतांशी आजही संवाद
रामदास कदम म्हणाले, राऊतांचा आणि माझा आजही संवाद आहे. त्यांना मी थांबाल का असे म्हटलो, थांबता आले तर थांबा बघा असे मी म्हटलो. त्यांचा पत्राकाळ प्रकरणात संबंध नाही असे ते म्हणाले तर बाब न्यायालयात सुटेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.