आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणामुळे वातावरण तापलेले आहे. आता या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनीही राजीनामा दिलेला आहे. भाजपकडून सातत्याने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आता या सर्व प्रकरणा नंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता है।. संजय राठोडांचा राजीनामा ही जनतेची मागणी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे. महाराष्ट्रात कोणत्याही महिलेवर अन्याय होत असेल तर, भाजपा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच संघर्ष करेल. जनता, भाजप आणि मीडिया या सर्वांच्या दबावामुळेच हा राजीनामा दिला गेला आहे. उद्धव जी यांना बाळासाहेबांच्या परंपरेनुसार पूजा चव्हाणला आधीच न्याय द्यायला हवा होता.' असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
शरद पवारांवर साधला निशाणा
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'आम्ही वारंवार ही मागणी केली होती की धनंजय मुंडेच्या मुद्द्यावरही हाच निर्णय घेतला गेला तरच सरकारची थोडीफार इज्जत वाचू शकते. नैतिकतेच्या आधारावर अशा मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांना कठोर पाऊल उचललीच पाहिजे. ' तसेच 'जे साहस उद्धव ठाकरे यांनी दाखवला आहे. तेच साहस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवला पाहिजे'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.