आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीचा निर्णय:तुमच्यासारखे नेतृत्व तयार करा मगच राजीनामा द्या - शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांची भावनिक साद

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''तुमच्या राजीनाम्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होई, तुमच्यासारखे नेतृत्व आधी तयार करा मगच राजीनामा द्या.'' असे भावनिक आवाहन शरद पवारांना त्यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी केले आहे.

ऐकून धक्का बसला

शरद पवार यांच्या भगीनी सरोज पाटील म्हणाल्या, ही बातमी अतिशय दुखःदायक आहे. खेदजनक बातमीने धक्का बसला. सध्या देशात अराजकता माजली. आम्ही पुढच्या पिढीला काय देणार हा प्रश्न आहे. अस्वस्थ वातावरण असताना शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

लोकांना धक्का पचेना

शरद पवार म्हणाले, लोकांना धक्का बसला आहे, मोठा नेता गेल्यानंतर जसे वातावरण होते तसे वातावरण झाले आहे. मलाही या निर्णयाचा खूप मोठा धक्का बसलाय, लोक रडत आहेत. लोकांना हा धक्का पचेना. आत्तापासूनच लोक राजीनामेदेत आहेत. मी घरचीच आहे. पण त्यांच्यावर अत्यांतिक प्रेम करणारे लोक आहेत. त्यांच्यापासून साथीदार दुरावले पण ते डगमगले नाही.

राजीनामा देणे दुखःदायक

सरोज पाटील म्हणाल्या, इडीचे संकट असतानाही व देशातील वातावरण पाहता त्यांची खूप गरज आज आहे. या पदावर त्यांनी राहावे असे वाटते. कितीही टीका करा त्यांनी कधीही त्यांनी वाईट शब्दात उत्तर दिले नाही. सुसंस्कृत व्यक्तिमत्व ते आहेत. अशा व्यक्तिमत्वाने राजीनामा देणे दुखःद आहे.

त्याचा सहवास आम्हाला हवाय

सरोज पाटील​​​​​​​ म्हणाल्या, शरद पवारांची दुसरी बाजू ही की, वय वाढले. प्रकृती साथ देत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, पर्यायी माणूस हवा. पण मी म्हणते की, खुर्ची सोडण्याआधी तुमच्यासारखा माणूस तयार करा, मग खुर्ची सोडा. सध्या खुर्ची सोडू नका, राष्ट्रवादी पक्ष दुबळा होईल. माझा तो भाऊ पण मी राजकारणात नसतानाही मला असंख्य काॅल आले, लोकांच्या भावना ओळखाव्यात व राजीनामा परत घ्यावा.

लोकांच्या भावना लक्षात घ्याव्या

सरोज पाटील ​​​​​​म्हणाल्या ''बहिण म्हणून मला वाटते की, तो आम्हाला खूप वर्ष हवाय. त्याची प्रकृती चांगली असावी, खूप वर्ष तो जगला पाहीजे. त्याच्यासोबत आम्हाला सहवास हवा आहे. हाही आमचा स्वार्थ आहे. पण लोकांच्या भावना लक्षात घेता त्यांनी विचार करायला हवा.