आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार 83 वर्षांचे आहेत. या वयातही ते तरुणांना लाजवेल असा दौरा करतात. आजच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत घोषणा केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर यापुढे जास्त मेहनत करण्याची गरज असल्याचे सांगत आगामी दौराही त्यांनी माध्यमांना सांगून टाकला. तरुणांनाही थकवा येईल असा हा आगामी दौरा करणाऱ्या 83 वर्षांचे पवारांची ईच्छाशक्तीची दाद द्यावी लागेल.
कसा आहे दौरा?
शरद पवार म्हणाले, कार्यकर्त्यांनी मला एवढे संपर्क केले तेव्हा वाटले की, जास्त मेहनत करण्याची गरज आहे. मी त्यामुळेच येथून पुणेला जात आहे. तेथून सोलापूर नंतर सांगोला त्यानंतर पंढरपूर आणि तेथून मी निपाणी ला जाऊन परत येथे (मुंबईत) येणार आहे.
बारसूच्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र
बारसू प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी मला माहिती दिली आहे. त्या भागातील अधिकाऱ्यांनीही मला याबाबत माहिती दिली आहे. त्या भागातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहे त्यांनीही माझ्याशी संवाद साधला आहे.
बारसूच्या लोकांना विश्वासात घ्या
शरद पवार म्हणाले, माझे स्पष्ट मत आहे की, बारसूतील शेतकऱ्यांच्या भावना सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या सरकारने लक्षात घेऊन ज्या भागात आपण प्रकल्प करीत आहोत त्या भागातील लोकांना विश्वासात घेत त्यांची सहमती घ्यावी ही जबाबदारी प्रकल्प आणणारांची असते. तशी तिथे आवश्यकता आहे.
आम्ही राज्य सरकारशी बोलू
शरद पवार म्हणाले, काही लोकांची सूचना आहे की, बारसूत ऑन द स्पाॅट आमच्या सहकाऱ्याने जावे. योग्य वेळी आम्ही तिथल्या स्थानिकांशी सुसंवाद करू. अनायसे जिल्ह्याजिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मी कटाक्षाने अवकाळी पाऊस, पंचनामे, अर्थसहाय्य याबाबत जाणून घेतले. योग्यवेळी राज्य सरकारशी आम्ही हे बोलू.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.