आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांवर सडकून टीका:‘राज्यपालांना परत पाठवा’ उद्धव ठाकरेंसह शरद पवार, उदयनराजेंची मागणी

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांना वृद्धाश्रमातसुद्धा कुणी घेणार नाही, अशांची राज्यपालपदी नियुक्ती होते आहे. मी राज्यपालपदाचा आदर करतो, परंतु कोश्यारींचा नाही. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना, अपमान कोश्यारींनी केला आहे. आता हे पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे. याविरोधात महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांवर गुरुवारी सडकून टीका केली आहे.

ठाकरे म्हणाले, ‘केंद्राला जाग येणे गरजेचे असून महाराष्ट्र हा लेचापेचा नाही, हे पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने विरोध करू, असे सांगतानाच महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा ठाकरेंनी दिला. राज्यपालांचा उल्लेख अ‍ॅमेझाॅनचे पार्सल असा केला.

राज्यपालांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या : शरद पवार राज्यपाल ही एक संस्था असून त्याची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून आतापर्यंत कुणी बोलले नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेला उल्लेख पाहिल्यानंतर कोश्यारी यांनी मर्यादा ओलांडल्या असून त्यांचा निकाल करावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...