आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामविआतील प्रमुख नेत्यांत काही मुद्यांवरून उघड मतभेत झाले आहेत. सावरकरांचा मुद्दा असो की, काॅंग्रेसची जेपीसी चौकशीची मागणी आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून जेपीसीबद्दलचे वक्तव्य यामुळे आज शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सिल्व्हर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास सव्वा तास या दोन नेत्यांमध्ये खलबतं झाली.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आठवाजता मातोश्रीवरून सिल्व्हर ओक येथे पोहचले. उभय नेत्यांत जवळपास सव्वातास चर्चा झाली. त्यानंतर ठाकरे पुन्हा मातोश्रीकडे निघाले. या बैठकीत ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून शरद पवारांशिवाय सुप्रिया सुळे यांची उपस्थित होती.
ठाकरे - पवार भेटीवर नरेश म्हस्केंची तिखट प्रतिक्रीया
शरद पवार - उद्धव ठाकरे भेटीवर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. आजही काही बैठका होत्या मात्र त्या बैठका देखील रद्द झाल्या. या बैठका नक्की का रद्द झाल्या याची माहिती माध्यमांनी घ्यावी. आमच्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा गायब असल्याने आणि या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली आहे.
'काका मला वाचवा'ची स्थिती
नरेश म्हस्के म्हणाले, शरद पवार आपली साथ सोडतात की काय ? अशी भीती वातल्यानेच 'काका मला वाचवा' असं म्हणत उद्धव ठाकरेनी घाबरून शरद पवार यांची आज त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.
लाचारांची स्वारी 'सिल्व्हर ओक'च्या दारी - मस्के
नरेश म्हस्के म्हणाले, ''ठाकरे आडनावाचा वारसा मिळाला असला तरीही स्वाभिमानाचा वारसा मात्र, उद्धव ठाकरे यांना लाभलेला नाही, त्यामुळेच कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या बाळासाहेबांचा मुलगा असूनही खाली मान घालून पवारांच्या घरी त्यांची मनधरणी करायला जावे लागले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आज पक्ष गेले, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला अशी झाली आहे.''
मतभेदाची खिंडार?
महाविकास आघाडीत सध्या मतभेद आहेत. काही मुद्द्यांवर त्यांचे एकमत नाही. त्यामुळे ही भेट महत्वाची ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री असो की, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी किंवा सावरकरांबाबतची भुमिका यावरुन आघाडीत मतभेदाची बिघाडी आहे.
...ही शक्यता
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभवासाठी एकत्र असणे आवश्यक आहे. हे उद्धव ठाकरेंनीही छत्रपती संभाजीनगरच्या सभेत सांगत आम्ही एकत्रच आहोत हे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे मविआ ही सध्यातरी अभेद्य आहे.
महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला कोणता मतदारसंघ द्यावा, याची चाचपणी आता सुरु झाल्याची शक्यता आहे. ठाकरे आणि पवार भेटीत या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.