आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर निकालावर प्रतिक्रिया:शरद पवार-उद्धव ठाकरे माझे डॉक्टर, त्यांनी राज्यात चांगली सर्जरी केली : संजय राऊत

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या पायाखालची सतरंजी लोकांनी का ओढली याचा विरोधीपक्षाने विचार करावा : राऊत

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आमचे डॉक्टर आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही मेडिकल टीम आहे. यांनी वर्षभरात महाराष्ट्र चांगल्याप्रकारे सर्जरी केली. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

मी रुग्णालयात असताना पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला. यात पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही महाविकास आघाडीने झेंडा फडकवला. ज्यांनी मुंबई महापालिकेवरील शिवसेनेचा झेंडा उतरवू असे म्हणणाऱ्यांच्या नागपुरातील 40 वर्ष फडकणारा झेंडा लोकांनी उतरवला, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. आपल्या पायाखालची सतरंजी लोकांनी का ओढली याचा विरोधीपक्षाने विचार करावा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. त्यामुळे आम्हाला जे आत्मचिंतन करायचे आहे ते करू. धुळे-नंदुरबारमधील विजयाचे श्रेय भाजपने घेऊ नये. ते पटेल यांनाच घेऊ द्यावे अशी टीकाही भाजपवर केली. भाजपने नागपूर, पुणे येथील पराभवाचे आत्मचिंतन करावे असेही राऊत करावे.

बातम्या आणखी आहेत...