आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी भूमिका कायमच ठाकरे गटाने घेतलेली आहे. मात्र नुकत्याच शरद पवारांच्या प्रसिद्ध झालेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, असे पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावर ठाकरे-पवारांची परस्परविरोधी भूमिका पाहायली मिळाली आहे.
मुंबई महाराष्ट्रात राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव याआधी देखील होता, अशी टीका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात प्रसिद्ध केलेल्या मजकुरात हा दावा खोडून काढला आहे. लोक माझे सांगातीत शरद पवारांनी घेतलेल्या अनेक भूमिका या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी तूर्तास एवढेच बोलेल मी माझ्या या मुद्द्यावर ठाम आहे, आणि राहिल, असे स्पष्ट केले आहे.
राजकीय घडामोडींवर भाष्य
राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. 2 मे रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा सोहळा झाला. लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत 70 पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019 नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे.
काय लिहिलेय पवारांनी?
शरद पवारांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात पान क्रमांक 417 वर लिहिले आहे, मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असे शरद पवारांनी ठामपणे लिहित या मुद्दयावरुन ठाकरेंना एकटे पाडल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनेच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.
संबंधित वृत्त
शरद पवार निवृत्तीवर ठाम:5 मे रोजी ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष; निवड समितीची पहिली पसंती सुप्रिया सुळे यांना
राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची ५ मे रोजी बैठक होईल. तीत नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.