आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद दौरा:शरद पवारांनी दिला खासगी डॉक्टरांना इशारा, म्हणाले - कोरोनाच्या संकटात काम करावंच लागेल, अन्यथा...

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यभरात विविध ठिकाणी भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेत आहे. यासोबतच तेथील स्थानिक समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांना इशारा दिला आहे. कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयांना आणि डॉक्टरांना काम करावंच लागणार आहे. पुढे ते म्हणाले की, सहकार्य न करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही पवारांनी दिला आहे.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. असं तज्ञांच मत आहे. अशा वेळी सरकारी डॉक्टरांची जास्त गरज असणार आहे. तेव्हा खासगी डॉक्टरांनाही सरकारी करावंच लागेल, त्यांना या कामात पूर्णपणे लक्ष द्यावं लागेलं. यासोबतच रुग्णांना नकार देण्याचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, या कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांनीही डॉक्टरांनी पूर्ण सहकार्य करायलाच हवे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे मदत मागितली तर त्यांना मदत मिळायलाच हवी. कोणी देत नसेल, तर हॉस्पिटल ताब्यात घेऊन समन्स देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. राज्यात सध्या बेड वाढवण्याची गरज आहे. ही एक कमतरता आहे. खासगी डॉक्टरांना या आजारात साथ द्यावी लागणार आहे.

Advertisement
0