आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sharad Pawar Was Given False Information While Defending The Home Minister; Big Statement Of Devendra Fadnavis In The Press Conference News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटीलिया प्रकरण:गृहमंत्र्यांचा बचाव करताना शरद पवारांना चुकीची माहिती पुरवली गेली; देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेत मोठे विधान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेताच्या तोंडून चुकीची माहिती प्रसारित केली गेली

दिल्ली येथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना योग्य माहिती न दिल्याने त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिली. एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेताच्या तोंडून चुकीची माहिती प्रसारित केली गेली. असे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदमध्ये सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वारंन्टाईन नसून ते आपल्या सात सहकाऱ्यांसोबत एका खाजगी विमानाने नागपुरहून मुंबईला आले होते. काल झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

व्हायरल कागदपत्राची पोलखोल करताना ते म्हणाले की, देशमुख हे त्या दिवशी घरी नसून त्यांना त्या दिवशी अनेक लोक भेटले असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. गृहमंत्री देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी एका खाजगी विमानाने मुंबईला आले होते. पोलिस विभागाच्या दैनंदिन कामाच्या परिपत्रकानुसार, ते मुंबईला 17 तारिखेला येणार असून दुपारी तीन वाजता सहृयाद्रीला भेट देणार होते. त्यानंतर 24 तारिखेला ते आपल्या मोटार गाडीने निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पोलिस पत्रकाच्या हवाल्याने विरोधी पक्षनेत्याने दिली.

फडणवीस सीबीआय चौकशीसाठी गृहसचिवांना भेटणार
संबंधित प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी करण्यासाठी फडणवीस गृहसचिवांना भेटणार असून संबंधित प्रकरणाची सर्वच पुरावे त्यांना सादर करणार आहे. त्यासाठी ते आज दिल्ली येथे जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...