आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

54 वर्षांपासूनचा अखंड प्रवास:1967 मध्ये पहिल्यांदा आमदारकीची शपथ ते 2020 मध्ये 16 व्यांदा घेतलेली शपथ, चारही सभागृहात काम करणारे पहिले नेते आहेत शरद पवार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

शरद पवार यांनी बुधवारी राज्यसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. ही शपथ साधी नव्हे तर खास होती. कोणत्याही सभागृहाचे सदस्य होताना घेतलेली सोळावी शपथ होती. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे चारही सभागृहात काम करणारे शरद पवार हे पहिलेच नेते आहेत. चारही सभागृहात काम करण्याच विक्रम त्यांच्या नावे गेला आहे. 

बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सोळाव्यांदा शपथ घेतली आहे. 79 वर्षीय शरद पवार यांनी आतापर्यंत 6 वेळा विधानसभा सदस्य, एकदा विधानपरिषद सदस्य, 7 वेळा लोकसभा सदस्य, तर दोन वेळा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. लोकशाहीच्या चारही सदनात प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव नेते आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी या बाबत सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 मध्ये शरद पवार सर्वात प्रथम आमदार म्हणून निवडून गेले होते. तेव्हापासून राजकीय जीवनात कोणत्याच निवडणूकीत अजूनही त्यांचा पराभव झालेला नाही. देशाच्या सर्व सभागृहात त्यांनी काम केलेले आहे. राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेसह लोकसभा व राज्यसभेतही शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या काम करत आहेत. 

Advertisement
0