आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवस:शरद पवारांचा 80 वा वाढदिवस व्हर्च्युअल रॅली, रोजगार मेळावे घेऊन साजरा होणार, मुंबईतील चव्हाण सेंटर येथे मुख्य सोहळा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पवार यांचा वाढदिवस तसा साधेपणाने साजरा होतो. पुण्यातील बारामती होस्टेल किंवा मुंबईतील चव्हाण सेंटर येथे पवार वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. १२ डिसेंबर रोजी त्यांचा ८० वाढदिवस आहे. हा वाढदिवस धूमधडाक्यात होणार असून व्हर्च्युअल रॅली, रक्तदान शिबिरे, युवकांना रोजगार, मेडिकल किट वाटप असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत पवार यांच्या वाढदिवशी ऑनलाइन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ८० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची े मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १३ ते २० डिसेंबर या काळात रक्तदान शिबिरे घेऊन स्वाभिमान सप्ताह साजरा करा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser