आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक राजकारण:IFSC मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, शरद पवारांची मोदींना पत्राद्वारे मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना, IFSC गांधीनगरमध्ये नेण्यात येत आहे

भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. परंतू,  आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईऐवजी गांधीनगरमध्ये होणार आहे. याबद्दल 27 एप्रिलला केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

केंद्राच्या या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. केंद्राचा हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. एकट्या मुंबईतून सर्वाधिक जास्त कर दिला जातो. एवढेच नाही, तर गुजरातपेक्षा महाराष्ट्र हा सर्वात जास्त निधी देणारे राज्य आहे. अशी परिस्थिती असतानाही मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये हलवणे योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय रद्द करावा', अशी मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच,  केंद्राचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून  या निर्णयानं राजकीय तिढा निर्माण होईलच पण मुंबईतलं केंद्र गांधीनगर येथे हलवणे देशाच्या अर्थकारणाला धोक्यात येईल, अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...