आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दर्शन:शरद पवार सहकुटुंब मुख्यमंत्री निवासस्थानावरील गणपती बाप्पाच्या दर्शनाला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शनानंतरचे फोटो ट्विटरवर केले शेअर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्याला कोरोना संकटातून लवकर मुक्ती मिळावी, मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

गणेशभक्त आज (अनंत चतुर्दशी) आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देणार आहेत. चतुर्दशीच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या- खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, नात आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, वरुण सरदेसाई आदी मान्यवरही हजर होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शनानंतरचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर दरवर्षी गणपतीचे आगमन होते. मुख्यमंत्र्यांनी गणरायाची सपत्नीक पूजा करण्याची परंपरा आहे. राज्याला कोरोना संकटातून लवकर मुक्ती मिळावी, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी गणरायाला घातले आहे.