आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणे प्रकरणावर प्रतिक्रिया:नारायण राणेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'मी फारसं महत्त्व देत नाही'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नारायण राणे आणि भाजपविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेले आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मी या प्रकरणाला फारसं महत्त्व देत नसल्याचे ते म्हणाले आहेत.

शरद पवार याविषयावर अगदी मोजक्या शब्दात बोलले आहेत. 'मला काही बोलायचे नाहीये. मी त्याला फारसे महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात', असे शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. नारायण राणे आणि भाजपविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.

काय आहे प्रकरण?
भाजप नेत्यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या निमित्त नारायण राणे हे सध्या कोकणामध्ये आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे न बोलता चुकून हिरक महोत्सव हा शब्द वापरला. दरम्यान तिथे उपस्थित राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले यानंतर मुख्यमंत्र्यांनी चूक सुधारत 'आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत' असे म्हटले होते. यावरुन राणे म्हणाले होते की, मी जर तिथे असतो तर कानाखाली लगावली असती. यावरुन नारायण राणेंवर टीका होत आहे आणि त्यांना अटकही झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...