आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंह राजपूत प्रकरण:सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - सुशांतसिंहच्या प्रकरणाचा सीबीआय तपास अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल - शरद पवार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करेल असा आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करावे असेही कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सीबीआयच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, असे ते म्हणाले.

शरद पवार यांचे ट्विट

मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही. असे ट्विट पवारांनी केले.

पवारांनी यानंतर त्यासंदर्भात दुसरे ट्विट करत म्हटले की, "सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल."

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. हत्येनंतर 9 महिने पोलिसांनी तपासाची हेळसांड केल्यानंतर तपास सीबीआयकडे वर्ग झाला, परंतु सीबीआयकडूनही तपास पूर्ण झालेला नाही. ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याची खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.