आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया यशस्वी:शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर असल्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती, सुप्रिया सुळेंनी शेअर केला फोटो

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी शरद पवारांना गॉल ब्लँडरचा त्रास होत होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे मंगळवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळेंनी शेअर केला फोटो

शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा रुग्णालयातील फोटो पोस्ट करत पवारांच्या आरोग्याविषयी माहिती दिली. सुळे म्हणाल्या की, 'ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचे रोजचे सर्वात आवडते काम अर्थात वर्तमानपत्रांचे वाचन, करत आहेत.'

सोमवारी शरद पवारांना गॉल ब्लँडरचा त्रास होत होता. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जास्त त्रास जाणवत असल्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

डॉक्टरांचे मानले आभार

ही शस्त्रक्रिया होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हे नेते रुग्णालयात उपस्थित होते. पवारांवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी या सर्वांसोबत एक फोटो ट्वीट केला आहे. यासोबतच त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...