आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sharad Pawar's Laparoscopic Surgery Today Updates: In Breach Candy Hospital Sharad Pawar's Gallbladder Surgery Successful Today; News And Live Updates

हेल्थ अपडेट:शरद पवारांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर असल्याची मलिक यांनी ट्वीटकरुन दिली माहिती

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यानुसार त्यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे हजर होत्या. त्यांची प्रकृती सध्या ठिक असून ते आता मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. ही आताची दुसरी शस्त्रक्रिया असून यापूर्वी गेल्या महिन्यात अशीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्यास सांगितले होते.

मलिक यांनी ट्वीटकरुन दिली माहिती
मलिक यांनी आपल्या ट्विटर हँडल असे म्हटले आहे की, डॉ. बलसारा यांनी आज पवार यांच्या शस्त्रक्रिया केली असून त्यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात झाली होती शस्त्रक्रिया
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे एंडोस्कोपी केल्यानंतर 15 दिवसांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार रविवारी ते रुग्णालयात दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...