आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चेला उधाण:शरद पवारांचा नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने चर्चेला आले उधाण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी काँग्रेसने दिले कोरोना संसर्गाचे कारण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा कोरोनाचे कारण देत रद्द करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले. कोराेनाचा प्रादुर्भाव जोरात असताना शरद पवार यांनी राज्याचा दौरा केला. त्यामुळे आता कोरोना ओसरत असताना दौरा रद्द करण्याचे कारण नाही. यामागे निश्चितच वेगळे कारण असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांचा पहिलावहिला उत्तर महाराष्ट्र दौरा असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

भाजपला रामराम ठोकल्यानंतर खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेशाच्या सोहळ्यातच उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याची घोषणा खडसे यांनी केली होती. जळगावमध्ये मेळावा घेऊन आमची ताकद काय आहे ते दाखवून देऊ, असे खडसे म्हणाले होते. त्यामुळे भाजपला खिंडार पाडण्यासाठी ते कोणती रणनीती आखतात, याविषयी तर्कवितर्क सुरू झाले होते. त्यातच २१ व २२ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा शरद पवारांनी केली होती.

पवारांच्या या दौऱ्याकडे सर्वपक्षीयांचे लक्ष लागले होते. पवारांच्या दौऱ्यात खडसे नेमकं कसं शक्तिप्रदर्शन करतात आणि भाजपचे किती मोहरे गळाला लावतात, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, पवारांनी हा दौरा अचानक रद्द केला. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे कोरोनाची लागण झाल्याने त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, खडसे स्वत: होम क्वारंटाइन आहेत. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला व त्या दौऱ्यात खडसेंनी उपस्थिती लावली तर चुकीचा संदेश जाईल, असा एक मतप्रवाह पक्षात होता. त्यातूनच पवारांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दौरा रद्द करण्याचे कुठलेही कारण पक्षातर्फे देण्यात आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...