आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा सोहळा झाला.
राजकीय वर्तुळात उत्सुकता
लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत 70 पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती कशी तुटली? आणि महाविकास आघाडीची निर्मिती कशी झाली?, यावर शरद पवारांनी सुधारित आवृत्तीत महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर येत आहे. तसेच, याशिवाय 2019नंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींवरही शरद पवार यांनी या आवृत्तीत भाष्य केल्याचे समजते. त्यामुळे या आवृत्तीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पहाटेच्या शपथविधीवर भाष्य असेल का?
'2015 ते आतापर्यंत वादळी कालखंड चितारणारी कलाकृती', अशी ओळख या दुसऱ्या आवृत्तीची करून देण्यात आली आहे. विशेषत: 2019 पासून राज्यात ज्या अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, त्यामध्ये सर्वाधिक गाजलेली घडामोड म्हणजे अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी. लोक झोपेतून जागे होण्यापूर्वीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, दुसऱ्या दिवशीच शरद पवारांनी संध्याकाळपर्यंत हे बंड मोडून काढले होते. नंतर अजित पवार यांचीही राष्ट्रवादीत घरवापसी झाली होती. मात्र, अजित पवार अचानक भाजपसोबत का गेले?, याचे स्पष्ट उत्तर अजूनही समोर आलेले नाही. या महत्त्वाच्या घडामोडीबद्दल दुसऱ्या आवृत्तीत काही सांगितले असेल का?, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
भाजपला शिवसेनेचे ओझे उतरावयचेच होते
दरम्यान, ‘लोक माझे सांगाती’च्या दुसऱ्या आवृत्तीत नेमके काय असेल?, याबाबत काही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. त्यानूसार, शरद पवारांनी म्हटले आहे की, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019नंतर चित्र बदलले. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझे उतरवून ठेवायचे असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचे दिसत होते.
संबंधित वृत्त
'लोक माझे सांगाती' भाग-2:शिवसेना आणि भाजपची युती का तुटली? मविआचा जन्म कसा झाला?, शरद पवारांनीच केला खुलासा
2019च्या विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अतिशय नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना व भाजपची युती तुटली. त्यानंतर शरद पवारांच्या पुढाकारानेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी तयार झाली. शिवसेना व भाजपची युती तुटण्यामागे नेमके काय कारण होते?, यावर अजूनही भाजप व शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. मात्र, आपल्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात स्वत: शरद पवार यांनीही या राजकीय संघर्षाबद्दल माहिती दिल्याचे समोर येत आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या जन्माची कहाणीही शरद पवार यांनी या पुस्तकात सांगितली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.