आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज जरी सुप्रिम कोर्टाने शिंदेच्या विरोधात निर्णय दिला तरी शिवसेना-भाजपचे विधानसभेत जे बहुमत आहे त्यावर काही परिणाम होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. एकीकडे संजय राऊत सातत्याने सरकार कोसळणार असल्याचा दावा करत असले तरी राष्ट्रवादीचे अंदाज आणि दावे त्यांच्या परस्परविरोधी दिसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, कायम जाहीर कार्यक्रमात रमणारा नेता, परंतु राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणीची तारीख जवळ आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाचा राबता कमी झाला आहे. यावरुन राजकीय नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सरकार कोसळणार असल्याचा दावा मविआतून केला जात आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार यांनी सरकारला कुठलाही धोका नसल्याचे विधान केले आहे. शरद पवार म्हणाले, सुप्रीम कोर्टातील निकाल हा शिंदे गटाच्या विरोधात लागला तरी विधानसभेत असणाऱ्या बहुमताला काही फरक पडणार नाही. 16 अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात लागला तरीही भाजप आणि शिंदेंच्या सरकारवर काहीच परिणाम होणार नाही. कारण तेवढी संख्या त्यांच्याकडे आहे.
चर्चांना उधाण
सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रकेबाबत सुप्रीम कोर्टातील निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र निकालाआधीच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची प्रतिक्रिया सूचक ठरत आहे.
संबंधित वृत्त
खळबळ:11 ते 13 मे च्या काळात वेगळे काहीतरी घडेल, ज्यातून फडणवीसांना मोठा धक्का बसेल; सुषमा अंधारे यांचा नवा दावा
11 ते 13 मे च्या काळात वेगळे काहीतरी घडणार आहे. देवेंद्र फडणवीसांना धक्का बसेल असे काहीतरी ते असेल, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सूषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.