आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे मला आता वाटते आहे. मात्र, जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असता'' असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज व्यक्त केले.
6 नको 5 मे रोजीच बैठक घ्या
शरद पवारांच्या वतीने प्राप्त निवेदनात राजीनाम्यावर भाष्य करण्यात आले आहे. त्यात पवार यांनी नमूद केले की, मी जर सर्वांना विश्वासात घेवून राजीनाम्याचा निर्णय घेतला असता तर तो पक्षातील नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्यच झाला नसता त्यामुळे मी हा निर्णय कुणाला कळवला नव्हता.
समितीचा निर्णय मान्य असेल
शरद पवारांतर्फे सांगण्यात आले की, आपण जी समिती गठीत केली त्यात राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यांची समिती माझ्या राजीनाम्याबाबत बैठक घेवून निर्णय घेणार आहे. परंतु, 6 मे रोजीची बैठक 5 मे रोजीच घ्यावी. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
ऐकून धक्का बसला
शरद पवार यांच्या भगीनी सरोज पाटील म्हणाल्या, ही बातमी अतिशय दुखःदायक आहे. खेदजनक बातमीने धक्का बसला. सध्या देशात अराजकता माजली. आम्ही पुढच्या पिढीला काय देणार हा प्रश्न आहे. अस्वस्थ वातावरण असताना शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
लोकांना धक्का पचेना
शरद पवार म्हणाले, लोकांना धक्का बसला आहे, मोठा नेता गेल्यानंतर जसे वातावरण होते तसे वातावरण झाले आहे. मलाही या निर्णयाचा खूप मोठा धक्का बसलाय, लोक रडत आहेत. लोकांना हा धक्का पचेना. आत्तापासूनच लोक राजीनामेदेत आहेत. मी घरचीच आहे. पण त्यांच्यावर अत्यांतिक प्रेम करणारे लोक आहेत. त्यांच्यापासून साथीदार दुरावले पण ते डगमगले नाही.
राजीनामा देणे दुखःदायक
सरोज पाटील म्हणाल्या, इडीचे संकट असतानाही व देशातील वातावरण पाहता त्यांची खूप गरज आज आहे. या पदावर त्यांनी राहावे असे वाटते. कितीही टीका करा त्यांनी कधीही त्यांनी वाईट शब्दात उत्तर दिले नाही. सुसंस्कृत व्यक्तिमत्व ते आहेत. अशा व्यक्तिमत्वाने राजीनामा देणे दुखःद आहे.
लोकांच्या भावना लक्षात घ्याव्या
सरोज पाटील म्हणाल्या ''बहिण म्हणून मला वाटते की, तो आम्हाला खूप वर्ष हवाय. त्याची प्रकृती चांगली असावी, खूप वर्ष तो जगला पाहीजे. त्याच्यासोबत आम्हाला सहवास हवा आहे. हाही आमचा स्वार्थ आहे. पण लोकांच्या भावना लक्षात घेता त्यांनी विचार करायला हवा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.