आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील मुलगा काहीतरी बरळतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या मुलाचे मी आभार मानतो, अशी उपहासात्मक टीका शरद पोंक्षे यांनी नाव न घेता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पोंक्षे यांनी मनसेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील 'जयोस्तुते' या व्याख्यानमालेत खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमके पोंक्षे काय म्हणाले?
अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव दर दोन-तीन महिन्यांनी आपल्याला न्यूज किंवा इतर माध्यमांतून ऐकायला येते 'कुणीतरी दिल्लीतला मुलगा काहीही बडबडतो, पण त्याचे मी आभार मानतो कारण त्या मुर्खामुळे थंड असणारा हिंदू समाज जागृत होत आहे. आपल्याला फार वेळ लागतो आणि एकदा का वाद पेटले, की मग आपण कोणाला ऐकत नाही, अशी प्रखर टीका त्यांनी केली आहे.
अहिंसेच्या अतिरेकामुळे लोक महाराजांबद्दल बोलतात
शरद पोंक्षे म्हणाले की, अहिंसेच्या अतिरेकामुळे लोक छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर बोलण्यावर वाद निर्माण करत आहेत. ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहिती नाही त्याला सावरकरांचा इतिहास काय माहिती असणार असा टोलाही पोंक्षेंनी लगावला आहे.
सामान्य माणसांची दहशत हवी
शरद पोंक्षे म्हणाले की, मी सावरकरांचे विचार पोहचवत आहे. महापुरुषांबद्दल कोणी अवाक्षर काढू नये अशी सामान्य माणसांची दहशत व्हायला हवी आणि निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांनी ही दहशत दाखवून द्यायला हवी. महापुरुषांचा अपमान कोणी करता कामा नये असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.