आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसर्च:मॅटो, पॉलिसीबाजार, नायका, पेटीएमच्या शेअर्समध्ये 6 0 % घट, नवीन एज टेक कंपन्यांच्या शेअर्सची घसरण कायम राहण्याची शंका

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षात नोंदणी झालेल्या नव्या पिढीतील स्टार्टअप मॅटो, पॉलिसीबाजार, नायका आणि पेटीएमच्या समभागांसाठी २०२२ वर्ष वाईट स्वप्नासारखे ठरले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत या समभागांमध्ये आतापर्यंत ६० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या बाजार भांडवलातही माेठी घसरण झाली आहे. ही घसरण कायम राहण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर बाजारात पॉलिसीबाजार (पीबी फिनटेक), नायका (एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर) आणि पेटीएम (वन ९७ कम्युनिकेशन्स) यांची नोंदणी नाेव्हेंबर २०२१ ला झाली हाेती, तर मॅटोच्या समभागांचे व्यवहार २७ जुलै राेजी सुरू झाले हाेते. यापैकी तीन नायका, पेटीएम आणि मॅटो यांचा या वर्षी फेब्रुवारीमध्ये निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांकात समावेश करण्यात आला.

पेटीएमचे मूल्यांकन ३/४ घटले
नोंदणीनंतर सर्वात वाईट स्थिती पेटीएम कार्यान्वित करणारी कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सची झाली आहे. नोव्हेंबर २०२१ पासून या कंपनीच्या मूल्यांकनात ७५% पेक्षा जास्त घट झाली आहे. शुक्रवारी मॅटोचे बाजार भांडवल निम्म्याहून कमी होऊन ४७,६२५ कोटी रुपयांवर आले. वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचे बाजार भांडवल १.११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

किमान पुढील ५ वर्षांपर्यंत नफा अपेक्षित नाही या नव्या युगातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या कंपन्या दीर्घकाळानंतर नफ्यात येणार आहेत. एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन म्हणाले, या कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक नवीन बाजारपेठ निर्माण केली आहे. मला वाटते की मॅटो, पॉलिसीबाझार आणि पेटीएमला नफा मिळवण्यासाठी आणखी ५ वर्षे लागतील. गुंतवणूकदारांना ही गोष्ट हळूहळू समजली आणि त्याचा परिणाम समोर आहे.

निफ्टी नेक्स्ट ५० चा हिस्सा आहेत पेटीएम, नायका आणि मॅटो
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटी पेटीएम, नायका आणि मॅटो यांचा निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांकात समावेश केला हाेता. याचा अर्थ निफ्टी ५० मध्ये देशातील मोठ्या कंपन्यांचा समावेश झाल्यानंतर या कंपन्या या श्रेणीत येतात.

बातम्या आणखी आहेत...