आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एल्गार परिषद भाषण प्रकरण:शर्जील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल, तो कुठेही असला तरी त्याला अटक करू; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शर्जील उस्मानी बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू

पुण्यात एल्गार परिषदेत केलेल्या आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी शार्जील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो कुठेही असला तरी त्याला अटक करू असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.

काय म्हणाले गृहमंत्री

पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असे देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांचे योगींना पत्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्राद्वारे केली आहे.

‘अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना हिंदू समाजाबाबत अत्यंत अपमानकारक भाषा वापरली आहे. ‘आजचा हिंदू समाज सडला आहे’, अशा वाक्यांचा त्यात समावेश आहे. त्याने समाजात तेढ निर्माण करण्याच्या भावनेतूनच अशा प्रकारची भाषा वारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या संविधानिक संस्थांविरोधातील ही भाषा म्हणजे राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हिंदू समाजाच्या भावनांना ठेस पोहोचली आहे’, असे पत्र चंद्रकात पाटील यांनी योगी आदित्यनाथांना पाठवले आहे.