आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:गुवाहाटी विमानतळावर शीना बोरा दिसली : इंद्राणी

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली मुलगी शीना बोरा हिच्यासारखीच तरुणी गुवाहाटी विमानतळावर दिसल्याचा दावा तिचीच आई इंद्राणी मुखर्जी हिने शुक्रवारी कोर्टात केला आहे. तसेच याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात यावेत, अशी मागणीही तिने आपल्या वकिलामार्फत केली आहे. २०१२ मध्ये शिना बोरा हिची हत्या करण्यात आली हाेती. हे प्रकरण २०१५ मध्ये उघडकीस आले होते. इंद्राणी मुखर्जी हिने शीनाची हत्या आपल्या चालकाच्या मदतीने केली होती. त्यानंतर इंद्राणी मुखर्जी हिला अटक करण्यात आली होती. तसेच तिचा पती पीटर मुखर्जी यालाही अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी इंद्राणी ही तुरुंगाबाहेर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...