आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:संजय राऊत यांना मानसिक आजार, त्यांना फक्त 'Entertainment' म्हणू शकतो; शीतल म्हात्रेंची जोरदार टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. आता शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच संजय राऊत यांना मानसिक आजार झाला असून त्यांना आपण फक्त 'Entertainment'म्हणून घेऊ शकतो, असा टोला शीतल म्हात्रे यांनी लगावला आहे.

रावणराज्य चालवणारे अयोध्येला जात आहेत, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. तसेच या महाराष्ट्रात आम्ही पुन्हा रामराज्य आणू, असा टोलाही त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला आहे. यावरुन शीतल म्हात्रे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

टीका करणे विरोधकांचे काम

शीतल म्हात्रे म्हणाल्या, टीका करणे विरोधकांचे कामच आहे. टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. टीका करण्यापलीकडे आता त्यांच्या हातात काहीही नाही. एके काळी तेही अयोध्येला जात असत. ते सुद्धा मोठा गाजावाजा करुन.

हिंदूंचा अपमान

संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी म्हणाले, हे सर्व लोक पाप धुण्यासाठी अयोध्येला जात आहेत. यावर शीतल म्हात्रे म्हणाल्या, गेल्यावर्षी तुम्ही सुद्धा अयोध्येला गेला होतात. तर तेव्हा तुम्ही काय धुवायला गेला होतात. त्यामुळे बोलण्यासारखे खूप काही आहे. मात्र आपण काय केले हे विसरु नये. मागच्या वर्षी तुम्ही सुद्धा अयोध्येला गेला होतात. जे हिंदुत्वाला मानणारे लोक, भाविक अयोध्येला जातात. हे सर्व लोक पाप धुण्यासाठी जातात, असे नाही. हा सर्व हिंदूंचा अपमान आहे.

ते काहीही बरळतात

शीतल म्हात्रे म्हणाल्या, संजय राऊत यांना मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते काहीही बरळत असतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट असे त्यांना घेऊ शकतात, असा टोला शीतल म्हात्रे यांनी लगावला.

रामराज्य आणू

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, आता कलियुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण नक्कीच या महाराष्ट्रात आम्ही रामराज्य आणू. 'रघुकुल रित सदा चली आये, प्राण जाये पर वचन न जाये' हे आमचे ब्रीदवाक्यच आहे. जी जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत ती आम्ही पूर्ण करुन दाखवू. आणि सगळ्यात महत्त्वाचे वचन तर हेच आहे की, लोकशाहीसाठी, संविधानाच्या रक्षणासाठी वज्रमूठ प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत.